Breaking News

पारनेर येथे माजी सैनिकांच्यावतीने वृक्षारोपण

 पारनेर/प्रतिनिधी
 पारनेर तालुका सैनिक फाउंडेशनचे कार्यकर्ते व सामाजीक कार्यकर्ते यांनी आज पारनेर-सुपा रोडवर, ग्रामीण रुग्णालयापासून गणपती फाट्या पर्यंत पिपंळ, चिंच, कडू लिंब असे विविध प्रकारचे वृक्षारोपन केले. काही दिवसापूर्वी जेसीपीने खड्डे घेवून त्याची चांगली मशागत करून या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केले.
 प्रत्येक मानसाने एक झाड लावून त्याला जगवण्याची जबाबदारी  घेतली पाहिजे. झाड हे आपल्या मुलाप्रमाने आहे, असे मानून त्याची काळजी घेतली पाहिजे, असे तालुका सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष सहदेव घनवट यांनी सांगितले. झाडे लावा देशाला वाचवा हे प्रत्येक घराघरातून जागरूक होने गरजेचे आहे. असे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले. झाडांना वाचवण्यासाठी काही लोखंडाच्या जाळ्या मी स्वंत: देणार असे जाधव यांनी सांगितले. सामाजीक कार्यकर्त भाऊसाहेब खेडेकर, सहदेव घनवट, बाळासाहेब जाधव, नितिन दावभट, गोरक्ष काळे, अशांबापू सुंबे, मारुती खेडेकर, जयेश गाडगे, संजय पठारे, गुलाब वाबळे उपस्थित होते.