Breaking News

‘दंगल गर्ल’ झायरा वसीमची बॉलिवूडमधून एक्झिट

मुंबई
‘दंगल’ या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणार्‍या जायराने अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. जायरानं नुकतंच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचे स्पष्टीकरणही दिले आहे.
झायारा वसीमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक 6 पानी नोट लिहित तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले आहे. तिने लिहिले, ‘5 वर्षांपूर्वी माझा नवा प्रवास सुरू झाला, बॉलिवूडमध्ये मी प्रवेश केला. आणि माझे आयुष्यच बदलून गेले. या क्षेत्राने मला खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळाले. पण त्यासोबतच मी शांतपणे किंवा अजाणतेपणे ‘इमान’च्या मार्गावरून बाजूला गेले. माझ्या इमानात ढवळाढवळ करणार्‍या वातावरणात मी सातत्याने काम करत राहिले. माझ्या धर्माशी असलेल्या माझ्या नात्यालाच आव्हान निर्माण झाले. माझ्या धर्माची जी मूलभुत तत्व आहेत, त्याचे मला ज्ञान नव्हते याची जाणीव झाली. आत्म्याच्या आवाजापासून दूर जाऊन घुसमट होते, या घुसमटीत जगणे असह्य आहे. महान आणि दैवी कुराणाच्या सान्निध्यात मला समाधान आणि शांती मिळते. मनाला खरोखर तेव्हा शांती मिळते जेव्हा त्याला निर्मात्याची ज्ञानप्राप्ती होते. झायरानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन झायराने हा निर्णय घेतला आहे का? अशी शंका उपस्थित केली आहे. झायराने तिच्या या पोस्टमध्ये कुरानमधील वेगवेगळे संदर्भ दिले आहेत. या क्षेत्राचा रस्ता मला अल्लाह पासून दूर करत आहे असेही झायराचे म्हणणे आहे. दंगल सिनेमाच्या वेळी जायराचा लुक समोर आल्यावर मुस्लीम कट्टरवाद्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व इस्लामच्या विरोधात असल्याचे त्यांच म्हणणे होते. पण त्यावेळी धमक्यांना न घाबरता काम करणार्‍या झहिरा वसिमने आज मात्र धर्माचे कारण देत अभियनातूनच एक्झिट घेत असल्याचे जाहीर केल्याने तिच्या या कृतीवर सोशल मीडियावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. याशिवाय जायरा सोशल मीडियावरील तिचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. लवकरच ती ‘द स्काय इडज पिंक’ या  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिची मुख्य भूमिका असू तिच्या व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्याही या सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केल असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.