$type=ticker$snippet=hide$cate=0

मातृभाषेचे शिक्षणातील महत्त्व

     ’शिक्षणाचा श्रीगणेशा’ करताना गेल्या काही वर्षांत ’प्रवेशाची समस्या’ टोक गाठू लागली आहे. शाळेची निवड अग्निपरीक्षा ठरत आहे. नजीकच्या क...

     ’शिक्षणाचा श्रीगणेशा’ करताना गेल्या काही वर्षांत ’प्रवेशाची समस्या’ टोक गाठू लागली आहे. शाळेची निवड अग्निपरीक्षा ठरत आहे. नजीकच्या काळात त्यात आणखी एक भर पडली आहे; ती म्हणजे ’माध्यमाची निवड’. कुटुंबात त्यावर आता चर्चा न होता वादविवाद घडू लागले आहेत. कधी आईवडिलांचे एकमत पण आप्तस्वकीयांचा वेगळाच सल्ला. कधीकधी सर्वांचे एकमत पण शेजार्‍यांच्या मुलाशी तुलना व त्यातून उडणारा गोंधळ. माध्यमाची निवड करताना कुठलेच तर्कशास्त्र वापरले जात नसल्यामुळे मध्यमवर्ग व कनिष्ठ वर्गांचा गोंधळ उडतो आहे. अन्य वर्गीयांचे अंधानुकरण करण्याचा कल योग्यच ठरेल असे नाही. पूर्वजांनी म्हटलेच आहे, ’अंथरुण पाहून पाय पसरावे’. साधन महत्वाचे नसून साध्य महत्वाचे असते. दुर्दैवाने साधनालाच साध्य मानण्याच्या गैरसमजामुळे ’इंग्रजी माध्यमाचे अंधानुकरण’ होताना दिसते आहे. महानगरातून हे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. अर्थातच त्याचा योग्य वापर, विनियोग झाल्यास आनंदच. इंग्रजी भाषेच्या तुष्टीकरणाचा हेतू इथे नसून, माध्यम म्हणून सारासार विचार न करता इंग्रजीचा अवलंब करण्याच्या मानसिकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्याचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. शिक्षणाचे माध्यम म्हणून अमुक एका भाषेची निवड करण्यामागचं प्रयोजन काय, हा प्रश्‍न अनेकांना निरुत्तर करतो. कारण मुळातच इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीची शिक्षणाचे माध्यम म्हणून निवड करणे यामध्ये संभ्रम झालेला असतो. इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी भाषेतून संपूर्ण शिक्षण घेण्याची खरंच आवश्यकता आहे का ? किंवा इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यावरच इंग्रजी येते असे आहे का ? आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते येतेच असे आहे का ? याचा सारासार विचार व्हायला हवा.
     मातृभाषेतून शिक्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे. मूल जन्माला आल्यानंतर भाषा शिकते, तेही शाळेत न जाता असे कुठे घडले आहे का ? मूल शाळेत गेल्यावरच बोलू लागले. नाही का ? कुठलीही भाषा समाजात, कुटुंबात वावरताना होणार्‍या संभाषणातून शिकली जाते. सतत कानावर पडणार्‍या शब्दांमुळे शब्दसंपत्ती वाढत जाते. त्यामुळेच शहरामध्ये मुले आपल्या भाषेव्यतिरिक्त अन्य भाषा सहजपणे (उदा. हिंदी) बोलू लागतात. सांगायचा मुद्दा हा की भाषा फक्त पुस्तकातून शिकली जाऊ शकत नाही, त्यासाठी कौटुंबिक-सामाजिक वातावरण पूरक असणे गरजेचे असते. आपली विचार प्रक्रिया मातृभाषेतून चालू असते. त्यामुळेच मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हृदयापर्यंत पोहोचते, तर अन्य भाषेतील फक्त मेंदूच्या पातळीवरच राहते. मराठी मातृभाषा असणार्‍या मुलांना इंग्रजी माध्यमातून दिले जाणारे शिक्षण आकलनाच्या पातळीवर जड जाते. कारण प्रथम येणारे ज्ञान हे मेंदूला मातृभाषेत रुपांतरित करावे लागते व नंतर ग्रहण केले जाते. आजचे युग संगणकाचे आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे काळाची गरज आहे. मान्य. परंतु त्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीतून घेण्याचा घाट घालणे कितपत व्यवहार्य ठरते, हा खरा कळीचा प्रश्‍न आहे. इंग्रजी भाषेचे ज्ञान असण्यासाठी सर्रासपणे माध्यम म्हणून इंग्रजीची निवड करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार ठरतो. इंग्रजीतून शिक्षण म्हणजेच करिअरची उत्तम संधी, केंद्रीय बोर्डाचा दर्जा हा राज्य बोर्डापेक्षा अधिक, इंग्रजी शाळांचे चकचकीत बाह्यरुप, अधिक शुल्क, ज्यांना परवडत नाही तेच फक्त मराठी शाळेत प्रवेश घेतात, आपल्याला जे मिळालेले नाही ते आपल्या पाल्यासाठी एनकेन प्रकारे देण्याची ऊर्मी, इंग्रजीतून बोलणारे म्हणजे हुशार, इंग्रजी म्हणजे यशाचा राजमार्ग, मातृभाषेविषयी न्यूनगंड यासारखे अनेक गैरसमज इंग्रजी माध्यमाच्या अंधानुकरणास कारणीभूत आहेत. भविष्यातील उच्च शिक्षणाच्या सुलभीकरणासाठी प्राथमिक स्तरापासून इंग्रजी माध्यमाचा स्वीकार संयुक्तिक वाटत नाही कारण फक्त 10-12 टक्के मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात.
     ‘यंग इंडिया’च्या 1 सप्टेंबर 1921 च्या अंकात गांधीजी म्हणतात : परकी माध्यमामुळे बालकांचा मेंदू थकतो आणि बुद्धीला मरगळ येते. त्यामुळे ती केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची करतात.
     कोठारी आयोगाने तर अगदी स्पष्ट शब्दात परकीय माध्यम नाकारलं आहे. आयोगाने सर्वच मुद्यांचा अगदी तपशिलाने परामर्श घेतलेला दिसेल. राष्ट्रीय एकात्मतेकरताही आयोगाला प्रादेशिक भाषा माध्यमच नितांत महत्त्वाचे वाटले. कोठारी आयोगानं पुढं म्हटलं आहे : प्रादेशिक भाषांतून दिलेल्या शिक्षणामुळे लाभ होतात आणि देशाच्या प्रगतीसाठी ते एक महत्वाचे पाऊल ठरेल, याविषयी आमची खात्री पटली आहे.. इंग्रजी बंदच करावी असे आम्ही सुचवत नाही. उलट शिक्षण अधिक परिणामकारक व उपयुक्त होईल, तेव्हा इंग्रजी व अन्य परदेशी भाषांमुळे लाभ होऊ शकेल.
1) महात्मा गांधी म्हणतात : मातृभाषा शिक्षणाचे योग्य माध्यम आहे व अधिक योग्य माध्यम अनुभव आहे.
2) जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणतात : मातृभाषाच मुलांच्या शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असुन त्याच भाषेतून त्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो.
3) अरुण फिरोदिया म्हणतात : मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढते, विषयांची समज येते व शिकलेले पूर्ण आत्मसात होते. तसेच त्यांच्या चौकस बुद्धी व सृजनशीलतेला अधिक वाव मिळतो.
     एकंदर सगळ्याच पातळ्यांवर मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले जाण्याची आवश्यकता व्यक्त झाली असताना सरकारकडून त्याबाबतीत काही कार्यवाही होताना दिसत नाही. त्याउलट खासगी आणि विशेषतः इंग्रजी शाळांना परवानगी देऊन बेरोजगारांच्या उत्पादनाचे कारखाने तयार केले जात आहेत. सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून, अनेक चळवळींनी प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सक्ती केली. त्या अनुषंगाने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत संविधानाच्या 45 व्या कलमात शिक्षणाची सक्ती केली. शिक्षणाला मूलभूत अधिकारांत स्थान मिळवून दिले. पण आता हा मूलभूत अधिकार राहिला असण्याची शक्यता धूसर बनली आहे. शिक्षणाचे बाजारीकरण याला कारणीभूत ठरत आहे. शिक्षणाचा सर्वसामान्यांचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला गेला आहे. जनसामान्यांत शिक्षणाबद्दल जी अनाठायी भीती निर्माण झाली आहे, ती या सगळ्याला कारणीभूत आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगिण विकास खुंटेल ही भीती पालकांच्या मनातून जायला हवी. तरच खासगी शाळा आणि मातृभाषेबाबतचा गैरसमज दूर होईल. खासगी शाळा या कोंडवाडे बनले आहेत. त्याचं मुक्तांगण झालं पाहिजे. 1993 साली सर्वोच्च न्यायालयाने उन्नीकृष्णन खटल्यात शिक्षणाचा मूलभूत अधिकार मान्य केला आहे. 2010 साली सरकारने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. परंतु त्याची अंमलबजावणी कितपत होते याबाबत शंका आहे. पालकांनी सजग बनल्याशिवाय त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार प्राप्त होणार नाही. त्याउलट नव्याने रुजवण होत असलेली शिक्षणव्यवस्था गोरगरिबांचे कंबरडे मोडत राहील. त्यासाठी आधी मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी अट्टहास धरला पाहिजे. त्याचा परिणाम म्हणून खासगी आणि इंग्रजी शाळांवर नियंत्रण येईल. सरकारी शाळांवर आलेले गंडांतर दूर होईल. त्यासाठी गरज आहे ती सार्वत्रिक इच्छाशक्तीची ! लॉर्ड मेकॉले म्हणतो त्याप्रमाणे देशाच्या सामाजिक उत्क्रांतीची पाळेमुळे घट्ट रोवली जाण्यासाठी हे आवश्यक आहे.

- प्रदिप जानकर
Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मातृभाषेचे शिक्षणातील महत्त्व
मातृभाषेचे शिक्षणातील महत्त्व
https://1.bp.blogspot.com/-LusLnpXqbuo/XUGQKtEKOWI/AAAAAAABUzw/ptUvF1Nkb_AjnEen82GM6CRwFHgfxtXogCLcBGAs/s1600/jankar.jpg
https://1.bp.blogspot.com/-LusLnpXqbuo/XUGQKtEKOWI/AAAAAAABUzw/ptUvF1Nkb_AjnEen82GM6CRwFHgfxtXogCLcBGAs/s72-c/jankar.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2019/07/blog-post_2627.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2019/07/blog-post_2627.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content