Breaking News

अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी साळुंके

कर्जत/प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी कर्जत येथील बाळासाहेब भागवत साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतचे पत्र त्यांना दिले आहे.
तत्कालीन प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विखे यांचा प्रचार केल्याने त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर युवा नेते करण ससाणे यांची राहुल गांधी यांच्या परवानगीने जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ससाणे यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला रामराम ठोकला व विखे यांना साथ दिली. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पुन्हा एकदा रिक्त झाले होते. नियमित अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. साळुंके काँग्रेस पक्षाचे कर्जतचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निवडीनंतर काँग्रेसच्या कर्जतमधील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.