Breaking News

परिवर्तनच्या ठेवीदारांचे जिल्हाकचेरीसमोर उपोषण

बीड | प्रतिनिधीः-
माजलगाव येथील परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को- ऑप. सोसायटी लिमिटेडच्या ठेवीदारानी आज जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु केले असून चेअरमन व संचालक मंडळाला अटक करण्यात यावी, यासह विविध मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना कळविल्या आहेत. परिवर्तन बँकेच्या ठेवीदारांनी आपली ठेवी परत मिळावी यासाठी आंदोलनाची हत्यार उपसले असून आज ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. परिवर्तन मल्टीस्टेटच्या बँकेच्या चेअरमनसह संचालक मंडळाला अटक करावी, संचालकाची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, फॉरेन्सीक ऑडीट करावे तसेच प्रशासकाची नेमणूक करून ठेवीदारांच्या ठेवी वसुली करून परत करण्याची करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व ठेवीदार उपोषणास बसले आहेत.