Breaking News

धारणगाव येथे उस उत्पादनांसाठी शेतीशाळा

कोपरगाव ता/प्रतिनिधी
शेतकर्‍यांचे एकरी उसाचे उत्पादन शंभर मेट्रीक्ट टन निघाले पाहिजे, यासाठी शासनांच्या कृषी विभागाकडून उस शेतीशाळा घेण्यांबाबत कृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ तालुक्यातील धारणगाव येथे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडळ कृषी अधिकारी मनोज सोनवणे, अदिनाथ आरणे, सहाय्यक संगिता सोळसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या उस शेती शाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले.
याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे उस तज्ञ पोपटराव खंडागळे यांनी उस संकरीकरण, बीजोत्पादन, एकरी शंभर टन उस उत्पादनासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन दिले. उस लागवडीपासून ते उत्पादकता वाढीपर्यंत त्यासाठी काय आवश्यकता आहेर. याचे शेतीशाळेत नियमीत मार्गदर्शन केले जाणार आहे. जीवाणू खतांची बीजप्रक्रिया व उस लागवड प्रत्याक्षिकावरही भर देण्यांत येणार आहे. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त उसाचे उत्पादन कसे मिळेल याबाबत शासनांने विशेष उपक्रम सुरू केला आहे.
 याप्रसंगी सरपंच नानासाहेब चौधरी, सचिन चौधरी, राहुल चौधरी, रविंद्र वहाडणे, श्रीकांत वहाडणे, संजय चौधरी उपस्थित होते.