Breaking News

लोहसरच्या दिंडीमध्ये तिरंगा झेंडा व राष्ट्रगीत

 करंजी/प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील दिंडीचे आज (सोमवार) सकाळी प्रस्थान झाले. यामध्ये भगव्या झेंड्यासोबत तिरंगा झेंड्याचा समावेश केला आहे. तसेच भजन, कीर्तनाबरोबर राष्ट्रगीतही गायले जाते. लोहसरमध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. भक्तीबरोबर भाविकांत, वारकर्‍यांत राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी दिंडीचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रमानंतर दररोज रात्री राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार अशी माहिती लोहसरचे सरपंच अनिल गिते यांनी दिले.  दिंडी प्रस्थानाच्यावेळी जी.प. सदस्य मोहनराव पालवे, अक्षय कर्डीले, पृथ्वीराज आठरे, हभप रामभाऊ वाढेकर, भाविक, दिंडीसाठी जाणारे वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.