Breaking News

नगरपंचायतमध्ये अडवणूकीचे धोरण- नंदकुमार पाटील

भाजपच्या आधीच क्रांतीकारीने व्यापारी संकुलाचे भूमिपूजन उरकविले


नेवासे/प्रतिनिधी
 नगरपंचायत निवडणूकीपासून आमचे नेते शंकरराव गडाख यांची विकासकामात राजकारण न करता सहकार्याची भुमिका घेण्याचे धोरण होते. त्यामुळे सर्व विकास कामांचे ठराव एकमताने घेण्यात आले. परंतू सत्ताधाऱी भाजपने नंतर राजकारण करून एकहाती श्रेय घेण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला. नगरपंचायतचा कारभार करताना क्रांतीकारीच्या दहा नगरसेवकांना विश्‍वासात न घेता आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या सांगण्यावरून अडवणूकीचे धोरण अवलंबवले जात आहे. लोकप्रतिनिधीने याबाबत फसवणूक केली असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
   उद्या रविवारी दि.14 जुलै रोजी भाजपच्यावतीने राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, अमित गोरखे यांच्या हस्ते भुमिपुजून केले जाणार आहे. या कार्यक्रमात क्रांतीकारीच्या नगरसेवकांना विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत असल्याने आज सकाळी क्रांतीकारीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या अगोदरच भुमिपूजनाचा कार्यक्रम उरकून घेतला असल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.   
  यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले की, व्यापारी संकुलासाठी वापरण्यात आलेला निधी हा नागरी सुविधेचा असल्याने व्यापारी संकूल व बाजारतळ सुशोभीकरण भुमिपूजन करण्याचा अधिकार नेवासकरांचा असल्याने तो कार्यक्रम क्रांतीकारी व नेवासकर नागरीकांच्या हस्ते करण्यात येत असल्याचे पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सध्या व्यापारी संकुलाच्या प्रश्‍नावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप व क्रांतीकारीत श्रेय घेण्यावरून स्पर्धा लागली आहे.        
  यावेळी फारूक आतार, अल्ताफ पठाण, संदिप बेहळे, अंबादास इरले, सतिष पिपंळे, सचिन वडागळे, जितेंद्र कुर्‍हे हे नगरसेवक तर सोसायटीचे अध्यक्ष दिलीपराव जामदार, बापू पटेल, माजी सरपंच शिवाजी टेकावडे, नरसु लष्करे, गणेश कोरेकर, सुनिल धायजे, इसाक मनियार, हरून जहागीरदार, महम्मद शेख, हारुणभाई  जहागीरदार, दिपक दुधे, अभिजीत मापारी, विनायक नळकांडे, राहुल देहदराय, किशोर सोनवणे, युनूसभाई नाईकवाडे, बाळासाहेब कोकणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गफुरभाई बागवान, विशाल सुरडे उपस्थित होते.