Breaking News

अवैद्य हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर छापा

आष्टी| प्रतिनिधीः-
तालुक्यातील कडा येथे एका हातभट्टीच्या अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनीङ्गछापा टाकत सुमारे दहा हजार रुपयेची हातभट्टी दारू जप्त केली यातील आरोपीने तेथून पलायन केले. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक विजय जाधव यांच्या पथकाने केली.असून या घटनेमुळे अवैध दारू विक्री त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील कडी नदीच्या काठावर हातभट्टी दारू निर्माण करण्यात येत असल्याची गुप्त माहिती बातमीदाराकडून आष्टी पोलिसांना मिळाली होती. शनिवार दि २८ जुन रोजी सायंकाळी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव आणि पोलिस शिपाई करंजकर,कोळेकर, अडागळे या पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. कडा येथील नदीच्या काठावर असणार्‍या या गावठी हातभट्टी अड्ड्यावर असणारे सय्यद रफिक सय्यद युसूफ असे आरोपीचे नाव असून यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात अवैध दारू विक्री करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.