Breaking News

अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था कडेकोट पोलिस बंदोबस्तात रवाना

श्रीनगर
अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था रविवारी जम्मू बेस कॅम्पवरून कडेकोट बंदोबस्तात रवाना झाला. 46 दिवस चालणार्‍या या यात्रेसाठी देशभरातून आतापर्यंत जवळपास दीड लाख भाविकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.  जम्मू बेस कॅम्प येथे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार के. के. शर्मा यांच्या उपस्थितीत अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था रवाना झाला. यात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच यात्रेदरम्यान सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती जम्मूचे मंडल आयुक्त संजीव वर्मा यांनी दिली.