Breaking News

दुखापतीमुळे विजय शंकर संघाबाहेर

मयांक अग्रवालला संघात स्थान

मुंबई
विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय खेळांडूना दुखापतीने ग्रासले असून, शिखर धवन नंतर आता विजय शंकर देखील संघाबाहेर गेला आहे. त्याच्याजागी मयांक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडसोबत सामन्यापूर्वी सुरु असलेल्या सरावादरम्यान जसप्रीत बुमराहने टाकलेला चेंडू त्याच्या पायाच्या अंगठ्यावर पडला. त्यामुळे त्याला पायाच्या अंगठ्यावर जखम झाली. या दुखापतीमुळेच त्याला इंग्लंड सोबत असणारा सामना खेळता आला नाही. आता बीसीसीआयने औपचारिकपणे आयसीसीला पत्र पाठवून खेळाडू बदलण्याची विनंती केली आहे. त्यामुळे विजय शंकर विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
याअगोदर शिखर धवनला दुखापतीमुळे विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते. त्याच्या जागेवर विजय शंकरला संधी देण्यात आली होती. परंतु, विजय शंकरलाही दुखापत झाल्यामुळे त्यालाही विश्‍वचषकातून बाहेर पडावे लागले आहे. दुखापतीमुळे विजय शंकरला इंग्लंड सोबतचा सामना खेळता आला नव्हता. या सामन्यात त्याच्या बदल्यात संघात ऋषभ पंतला तात्पुरता स्थान देण्यात आले होते. मात्र, विजय शंकरच्या दुखापतीला तीन आठवडे लागतील. त्यामुळे आयसीसीने बीसीसीआयला खेळाडू बदलण्याचे निवेदन पाठवले आहे. या निवेदनानंतर विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालचे संघात स्थान निश्‍चित होऊ शकते.