Breaking News

महावितरणच्या अभियंता, कर्मचार्यांच्या मनमाणी कारभाराची वरिष्ठांकडून पाठराखण

तेलगाव येथिल उपकार्यकारी अभियंता नागुल यांच्या तक्रारीकडे अधिक्षक अभियंताचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
 
तेलगाव | प्रतिनिधी
तेलगाव येथे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री नागुल याच्या मनमाणी व गैरकारभाराबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी वडवणी येथिल ग्राहकांनी अधिक्षक अभियंता , म.रा .वि. वी .कं. मंडळ कार्यालय बीड यांचेकडे रितसर लेखी तक्रार दिलेली असुन आजपर्यंत त्या तक्रारीची कसलिही दखल घेण्यात आलेली नसल्याने आता महावितरणच्या अभियंता , कर्मचार्यांच्या मनमाणी व गैरकारभाराला वरिष्ठ अधिकार्यांचेच अभय असल्याचे स्पष्ट होत आहे .
गेल्या काही महिन्यापूर्वी ते गाव येथिल महावितरणचे उपकार्यकारी अभियंता म्हणून श्री एम.एस.नागुल हे रुजू झाले होते रुजू झाल्याच्या सुरुवातीपासुनच त्यानी आपल्या मनमानी कारभाराला सुरुवात केली होती .वडवणी तालुक्यात तर त्यांच्या कार्यकाळात विजेचा सततच खेळखंडोबा चालु असतो किरकोळ बिघाडावरुन शहरात चार - चार दिवस विजेचा खेळखंडोबा दुरूस्त होत नाही शिवाय तेलगाव बरोबरच वडवणी येथिल अभियंता पदाचाही चार्ज नागूल यांचेकडेच असल्याने ग्राहकांना आता विजेजासाठी तक्रार कोठे करायची हा प्रश्न पडलेला असतो शिवाय नागूल हे महिन्यातून नेहमीच गैरहजर राहत असल्याने कर्मचार्यावर कसलाही अंकुश न राहिल्याने ग्राहकांची विजेची सततचीच गैरसोय होताना दिसत आहे शिवाय श्री नागुल याच्या मनमानी व गैरकारभाने सर्वसामान्य व्यावसाइक , ग्राहक पुरते वैतागलेले आहेत . सर्वसामान्य ग्राहकांना किरकोळ कारणांवरुन वेठीस धरत हजारो रुपयांचे दंड तसेच विजबिल दिल्या जात आहेत तर दुसरीकडे    त्यांच्या मर्जितील तसेच ज्या ठिकाणी आधिकारी , कर्मचारी यांची बसऊठ असेल मोठमोठ्या विजचोर्या पाठीशी घालुन त्यांना कमीतकमी विजबिल देण्यात येत असल्याने श्री नागुल यांच्या या मनमाणीकारभाराल ग्राहक वैतागलेले आहेत .याबाबत कित्वयेकवेळा ग्राहकानी श्री नागुल यांच्याशी संपर्क साधत तक्रारी केल्या परंतु त्यांनी सातत्याने ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने शेवटी नागुल यांच्या मनमाणी व गैरकारभाराबाबत ग्राहकांनी अधिक्षक अभियंता म.रा.वि.वी.क.मंडळ कार्यालय बीड यांच्याकडे गेल्याङ्गदोन आठवड्यांपूर्वी रितसर लेखी दिलेली आहे परंतु तक्रार देऊनही अद्यापही त्या तक्रारीची कसलीच दखल न घेतल्याने उपकार्यकारी अभियंता श्री नागुल व कर्मचार्यांच्या मनमाणी कारभाराला वरिष्ठ अधिकारीच पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट दिसुन येत असुन महावितरणच्या आधिकारी व कर्मचार्यांची तक्रार आता करायची तरी कोणाकडे असा प्रश्ना आता ग्राहकांनासमोर निर्माण झाला आहे .