Breaking News

पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत मधील थकबाकीदारांना नोटिसा

नोटीसानंतर दोनच दिवसात 17 लाखांचा कर वसूल

पारनेर/प्रतिनिधी
 पारनेर तालुक्यातील 43 ग्रामपंचायत मधील थकबाकीदारांना लोक न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. ज्या थकबाकीदारांनी अध्याप ग्रामपंचायत कर जमा केला नाही, त्यांनी तो त्वरित जमा करण्यासाठी न्यायालयाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहे. यामुळे दोन दिवसांमध्ये तब्बल 17 लाख एकूण 69 हजार रुपयांचा कर वसूल  झालेला आहे. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या थकीत कराची वसूली करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार पन्नास टक्के पेक्षा जास्त थकबाकी असलेल्या गावातील लोकांना लोक न्यायालयाने नोटीसा बजावल्या आहेत.
  पारनेर तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीमधील 25 थकबाकीदारांचे प्रकरणे लोक न्यायालयामध्ये देण्यात आले होते. झालेल्या सुनावणीमध्ये लोक न्यायालयाने या थकबाकीदारांना त्वरित आपला कर भरण्यासाठी नोटिसा बजावल्या. तत्काळ कर भरणार्‍यानां पाच ते दहा टक्के पर्यंत सवलती देण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्याप्रमाणे दोनच दिवसांमध्ये पारनेर तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीमधील तब्बल सतरा लाखाहून अधिक कर वसूल झाला आहे. पन्नास टक्के पेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन तर सत्तर टक्के पेक्षा जास्त थकबाकी असलेल्या गावच्या ग्रामसेवकाचे वेतन यामुळे रोखले जाऊ शकते. त्यामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे 43 गावातील थकबाकीदारांना लोकन्यायाने नोटीसा बजावल्या. ही लोक आदलत तीन महिन्यातून घेतली जात असून जास्तीत जास्त जुने व मोठे थकबाकीदार यांची प्रकरणे या अदालत मध्ये दिली जात आहे.

  लोकांनी ग्रामपंचायत कर भरला नाही तर ग्रामविकासासाठी असणारे ग्रामपंचायत आर्थिक नियोजन कोलमडले जात आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त कर थकला तर ग्रामपंचायतीला सक्षमतेचा दाखला देता येत नाही व त्यामुळे जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या अनेक योजना पासून ग्रामपंचायत वंचित राहू शकते.
   - विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी पं.स.पारनेर