Breaking News

पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी कालव्यांना पाणी सोडा -कोल्हे

कोपरगाव ता/प्रतिनिधी
 मागील वर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी झाले, त्याची झळ चालू वर्षी जानेवारीपासून बसायला सुरूवात झाली. जुलै महिना सुरू झाला पण दमदार पाउस नसल्यानेे पाण्यांचे स्त्रोत अटले आहे. दारणा गंगापूर धरण कार्यक्षेत्रात बर्‍यापैकी पाउस असून त्याचा साठा अनुक्रमे 67 व 51 टक्के झाला आहे. तेंव्हा गोदावरी कालव्यांना तातडींने पिण्याचे पाण्याचे आर्वतन सोडावे, अशी मागणी आ.स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तसेच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता नाशिक पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे केली आहे.
   आ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, कोपरगाव शहरात सध्या दहा ते बारा दिवसाआड पिण्यांच्या पाण्यांचा पुरवठा करावा लागत आहे. ग्रामिण भागातही साठवण पाण्यांचे तलाव कोरडेठाक पडले आहेत. पाउस नसल्यांने विहीरींना पाणी नाही. पिण्यांच्या पाण्यांबरोबरच जनावरांच्याही पाण्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पाण्यांचे टँकर सुरू करणे शासनास परवडणारे नाही. गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे म्हणून मंबई येथे दोन तीन वेळा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी केली आहे. बागायती भागातील पट्ट्यातही तीव्र पिण्यांच्या पाण्यांची टंचाई आहे. पावसाचे पाणी सध्या गोदावरी नदीला सोडले जात आहे. तेच पाणी कालव्यात सोडले असते तर आसपासच्या विहीरींना पाणी उतरून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असती. दारणा धरणांत आजच्या घडीला 4 हजार 839 दलघफु (67.69 टक्के) तर गंगापूर धरणांत 2 हजार 876 दलघफु (51.08 टक्के) पाणीसाठा झालेला आहे. गोदावरी कालव्यांना पिण्यांच्या पाण्यांची तातडींने आर्वतन सोडून नागरिकांना दिलासा द्यावा, गुरूपौर्णिमा उत्सव काळात शिर्डी साईबाबा येथे देश विदेशातील भाविक पालख्या घेवून दर्शनासाठी येतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण तयार झाली आहे. असेही त्या म्हणांल्या.