Breaking News

पर्यावरण संवर्धन काळाची गरज : आ.कोल्हे

कोपरगाव / ता.प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन काळाची गरज झाली आहे, दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणाने पर्जन्यमान कमी. होऊ लागले आहे त्यासाठी भाजपा सेना युती शासनाचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी 'एकच लक्ष तेहतीस कोटी वृक्ष' लागवड उपक्रम हाती घेतला आहे असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

    येथील नव्याने बांधलेल्या तहसिल कार्यालयाच्या आवारात आ.स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सामाजिक वनीकरण उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी सामाजिक वनीकरणांच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा रक्ताटे यांनी प्रास्तविक केले. तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत कोपरगांव तालुकावासियांनी हे अभियान यशस्वी करण्यांसाठी सर्वांनी सहकार्य करावे.  याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, सेनेचे कैलास जाधव, महिला शहराध्यक्षा शिल्पाताई रोहमारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, गटनेते रविंद्र पाठक, शहराध्यक्ष कैलास खैरे, वैभव आढाव, सत्येन मुंदडा, संजय पवार, स्वप्नील निखाडे, हर्षा कांबळे, मुकूंद काळे, कैलास रहाणे, प्रभारी गटविकास अधिकारी पी. डी. वाघीरे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते. नायब तहसिलदार मनिषा कुलकर्णी यांनी आभार मानले.