Breaking News

गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी
अरणगाव मेहेराबाद व परिसरातील गरजू, निराधार व वंचितांना आरोग्य  समाज व शिक्षणाच्या  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेली मेहेरब्लेस्ड् संजीवन वेलफेअर फौंडेशन  या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वाहन अनुसंधान तथा विकास स्थापन संस्थेच्या सेवा समिती यांच्या विशेष सहकार्याने अरणगाव मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मेहेरबाबा विद्यालयमधील विद्यार्थांना रामदास भोर (सभापती पं. समिती), मेहेरनाथ कलचुरी विश्‍वस्त अवतार मेहेरबाबा ट्रस्ट यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप  करण्यात आल्या.
यावेळी गट शिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, पंचायत समिती सभापती रामदास भोर, मेहेरनाथ कलचुरी विश्‍वस्त अवतार मेहेराबाबा ट्रस्ट, अवतार मेहेरबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल दळवी, केंद्रप्रमुख धामणे सर, अरणगाव सरपंच स्वाती गहिले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन गहिले, एकनाथ देवकर, सोन्याबापू काळे, ज्ञानेश्‍वर देशमुख, बाबा दळवी, अरणगावच्या जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप दहिफळे, ग्रामपंचायत सदस्य बबन शिंदे, वर्षा जाधव, मीरा कांबळे तसेच वि. का. से. सोसाटीचे चेअरमन ज्ञानदेव शेळके, गोपी गहिले, सूरज शिंदे, ओंकार देवकर, जालिंदर गहिले, नवनाथ पुंड, शीतल कल्हापुरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.