Breaking News

महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील मॅनेजर अनुपस्थित असल्याने शेतकर्‍यांची हेळसांड

शिवसेनेने भेट देऊन मॅनेजरच्या केली बदलीची मागणी

केज| प्रतिनिधीः-
केज तालुक्यातील युसुफ वडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकर्‍यांची प्रचंड गर्दी होत असुन पिकविमा व अनुदानाचे पैसे काढण्यासाठी शेतकरी रांगा लावून ताटकळत थांबत आहेत. यामध्ये मॅनेजरच्या अरेरावीपणामुळे शेतकरी संतप्त झाले असून पेरणीच्या दिवसांतही पैसे लवकर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.म्हणुन शिवसैनिकांनी बँकेला भेट देऊन मॅनेजरच्या रीकाम्या खुर्चीचे पुजन केले व तात्काळ या मुजोर मॅनेजरवर कारवाई केली नाही तर शिवसेना शेतकर्‍यांसोबत तिव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे,शहर प्रमुख अनिल बडे, युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, शिवसेना सचिव अशरफ शेख,सर्कल प्रमुख रामभाऊ पवार,शाखाप्रमुख श्रीकांत गायकवाड  सह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.