Breaking News

बांधावरील झाड तोडल्याने दोन शेतकर्‍यांमध्ये भांडण

बीड | प्रतिनिधीः-
बांधावर असणारे झाड एका शेतकर्याने तोडल्याने दुसर्या शेतकर्याने बांधावरचे झाड का तोडले अशी विचारना केली असता त्यांचे भांडण जुटले. तेंव्हा फियार्दीस लाथा आणि बुक्क्याने जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता तुळशीराम ठाकरे रा.वाकनाथपुरा ता.जि.बीड यांच्या शेता शेजारील रामेश्‍वर मारोती गांडगुळे यांची शेत जमीन यांची शेत जमीन असून या दोन्ही शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर एक झाड होते. ते झाड एकाने तोडले तेंव्हा फिर्यादीने मला न विचारता तु हे झाड का तोडले अशी विचारना केली असता आरोपी मारोती रामेश्‍वर गांडगुळे आणि रणजीत रामेश्‍वर गांडगुळे या दोघांनी संगनमत करून फिर्यादीस लाथा बुक्क्याने जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.१९२/२०१९ नुसार कलम ३२३, ५०४, ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार हनुमंतत इंगळे हे करत आहेत.