Breaking News

चिमुकला नाल्यात पडल्याप्रकरणी महापौर पीडित कुंटुंबाच्या भेटीला

मुंबई
 गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे नाल्यात वाहून गेलेल्या दिव्यांशच्या कुटुंबीयांची मुंबई महापालिकेचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत महाडेश्‍वर यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.दोषींवर कारवाईचे आदेशयावेळी त्यांनी घटना घडली त्या नाल्याची पाहणी केली. नाल्यात वाहून गेलेल्या दिव्यांशच्या घरी भेट देऊन महापौर महाडेश्‍वर यांनी त्याच्या आईचे सांत्वन केले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर देखील उपस्थित होते. तेरा तास उलटुनही नाल्यात पडलेला दिव्यांश सापडला नाही. त्याच्या शोधासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथक प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप पर्यंत दिव्यांशचा पत्ता लागला नाही.
दरम्यान, मुलगा हरवला म्हणून दिव्यांशच्या विउलांनी एकच हंबरडा फोडला.  मी रात्री मुलासोबत वेळ घालवून घराबाहेर पडलो. मात्र, मला पाहण्यासाठी दिव्यांश बाहेर आला होता. त्याच्या पाठी त्याची आईही धावत आली. पण, अवघ्या 15 सेकंदात तो नाल्यात पडल्याचे सिंग यांनी सांगितले. पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात आपण गुन्हा दाखल करणार आहोत. तसेच ही लढाई आपण शेवटपर्यंत लढणार आहोत, असेही सिंग म्हणाले. गोरेगावच्या आंबेडकरनगर मध्ये बुधवारी मुसळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे गटार मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास घराबाहेर आला आणि चुकून उघड्या गटारात पडला. गटारातील पाणी जोराने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबतच तो वाहून गेला.घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरू केला. गेल्या 13 तासांपासून बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. या घटनेला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दिव्यांशच्या वडिलांचा आक्रोश
माझा हिर्‍यासारख्या मुलगा हरवला आहे. पालिकेने माझ्या मुलाला लवकर शोधावे, अन्यथा मी रस्ता अडवून धरेल, असा इशारा नाल्यात पडलेल्या दिव्यांश सिंगचे वडील सूरज सिंग यांनी दिला आहे. 13 तास उलटूनही दिव्यांश सापडत नसल्याने त्याच्या कुंटुबीयांचा आक्रोश सुरू आहे.दिव्यांशच्या वडीलांचा रास्ता रोकाचा इशारामुलाचे वडील सूरज सिंग, नातेवाईक आणि स्थानिकांनी गोरेगाव पूर्व पश्‍चिमेला जोडणार्‍या विरवानी रस्त्यावर रास्ता रोको केला. मुलगा मिळत नाही तोपर्यंत रस्ता अडवून ठाण मांडणार्‍या दिव्यांशचे वडील सूरज सिंग व पाच नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.