Breaking News

जामखेड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे प्रा.शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 जामखेड ता/प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील धनेगाव ते चिंचपूर व धनेगाव ते सोनेगाव या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत अकबर फाटा ते जिल्हा हद्द चिंचपूर रस्त्यासाठी 2 कोटी 7 लाख रुपये खर्चून रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
 तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व रस्ते हे डांबरी करणाने जोडले गेले आहेत. संपूर्ण मतदारसंघात रस्त्यांना पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अकबर फाटा ते चिंचपूर रस्ता झाल्यास दोन जिल्ह्यांच्या दळणवळण करणे सोपे होणार आहे. त्यामुळे अनेक दुध व्यवसाय असणार्‍या शेतकर्‍यांना या रस्त्यामुळे फायदा होणार आहे. अनेक वर्षापासून हा रस्ता राहिला होता. परंतु प्रा.राम शिंदे यांच्या दूर दृष्टीने या रस्त्यासाठी विशेष प्रयन्त करून हा रस्ता मंजूर केल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, उपसभापती सुर्यकांत मोरे, सरपंच महेश काळे, माजी सरपंच सुधीर काळे, संचालक पृथ्वीराज वांळूजकर, उपसरपंच चञभूज बोलभट, चेअरमन तुराब शेख, बांधखडकचे सरंपच केशव वनवे, सातेफळचे संरपच गणेश लटके, पणन संचालक पांडुरंग उबाळे, चेअरमन जयराम खोत, संचालक ईश्‍वर चव्हाण, माजी चेअरमन उत्तम रसाळ, नसीर पठाण, सुनील यादव, माजी सरपंच भारत काळे, सचिव शाहजी वाघ, नगरसेवक भाऊराव राळेभात, गोरख घनवट, माणिक चव्हाण, बालाजी रसाळ, किशोर भोळे, महादेव रसाळ, बाळासाहेब काळे, संदीप टिपरे, पंडित चव्हाण, अमोल काळे, मनोहर टिपरे, सुभाष काळे, संदीप लव्हाळे, विजयकुमार बोलभट, शिदे, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे, उपअभियंता मोहन दिलवाले, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, कृषी पर्यवेक्षक घोडे उपस्थित होते.