Breaking News

भिंगार येथील रयत शाळेत गणवेश वाटप

भिंगार/प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने श्रीमती मायावती अ‍ॅबट गुरुदिताशहा रयत हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद मुळे म्हणाले, “ सर्व विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदासारखे आचार, विचार व चारित्र्य यांचा अभ्यास करुन त्या प्रमाणे आचरण करावे त्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्यासाठी एक प्रकारचा आत्मविश्‍वास स्वतःमध्ये निर्माण होईल व भावी आयुष्यात  कितीही मोठे झाला तरी  गरीब विद्यार्थ्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत कशी करता येईल या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’
यावेळी स्वामी विवेकानंंद जनकल्याण प्रबोधिनी  ट्रस्टचे उपाध्यक्ष सुभाष त्रिमुखे यांनी भविष्यात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तर ट्रस्टच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन दिले.
यावेळी ट्रस्ट संचालक अशोक एकबोटे, श्रीपाद मुंगी, शेखर चौधरी, रुपेश भंडारी, शशिकला शेंडे तसेच सुधाकर झांबरे, मुख्याध्यापक शेळके सर व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते. संस्थेच्या वतीने  आभार प्रदर्शन झाले.