Breaking News

पान असोसिएशनतर्फे वारकर्‍यांना फळांचे वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी
आषाढी एकादशीसाठी नगर शहरातून जाणार्‍या पालखी दिंडी आणि   वारकर्‍यांचे स्वागत जिल्हा पान असोसिएशनतर्फे करण्यात आले.  असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी फळांचे वाटप केले.
सामाजिक कार्यकर्ते फैय्याज तांबोळी यांच्या पुढाकारातून वसंत टॉकीज चौकात फळ वाटप कार्यक्रम झाला. यावेळी मोईन बागवान, जॅकी शेख, शरद भापकर, प्रकाश लोखंडे, संतोष जाधव, सचिन खरपुडे, रमेश कापरे, बंडू जाधव, बन्सीभाई पानवाले, बबन पवळ, बबलू काजळे, स्वामी भापकर, गौरव घोरपडे, गणेश पवार, मुरलीधर डहाळे, नफीन खान उपस्थित होते.
पान असोसिएशनतर्फे वर्षेभर सामाजिक उपक्रम राबविले जातात, अशी माहिती यावेळी फैय्याज तांबोळी यांनी दिली. गरजूंना मदत हा प्रत्येक उपक्रमांमध्ये हेतू असतो. गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप देखील केले जाते, असे तांबोळी यांनी सांगितले.