Breaking News

पिंपळनेर शाळेत वृक्षारोपण

पिंपळनेर | प्रतिनिधीः-
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जि.प. माध्यमिक शाळेत शनिवारी दुपारी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळ जवळपास ७५ ते ८० वेगवेगळ्या वृक्षाची लागवड करण्यात आली.
पिंपळनेर येथील महात्मा फुले सेवाभावी संस्था, संकल्प युवक क्रीडा मंडळ व जयहिंद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सदरील वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुहास साळवे तर प्रमुख पाहूणे म्हणून उपसरपंच राजाभाऊ गवळी, सुरज सिरसट, योगेश नरवडे, शेख अनिस, अशोक पटाईत, नितीन सिरसट सह आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम मान्यवरांनी विदद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व आणि गरज यांचे महत्व सांगीतले. नंतर वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला भागवत ठोकरे, उमेश ठोकरे, अरुण पेंढारे, अजय सिरसट, सतीश इतापे, स्वप्निल ढेंगे सह आदी उपस्थित होते