Breaking News

खंडू भुकनला पोलिस कोठडी

संदिप वराळ हत्याप्रकरण

पारनेर/प्रतिनिधी
 तालुक्यातील निघोज मधील संदिप वराळ हत्याप्रकरणी माजी उपसभापती खंडू भुकनला तपास कामी पारनेर न्यायालयाने दि.15 जुलै पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 21 जाने 2017 घटना घडल्यापासून भुकन हा फरार होता.
 त्याने जामिन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, पण न्यायालयाने जामिण फेटाळल्यांने भुकन हा पारनेर न्यायालयात आठ जुलैला हजर झाला. त्याळेस न्यायालयाने 22 जुलै 2019 पर्यंत भुकनला न्यायालयीन कोठडी दिली होती. तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक मनिष कलवाणिया यांनी पारनेर न्यायालयाकडे भुकन हा घटना घडल्यापासून कुठे होता, त्याला कुणी आश्रय दिला, आरोपीच्या संर्पकात होता का या तपासा करीता पोलिस कोठडी मिळण्यांकरीता अर्ज दिला होता. न्यायालयांने तो मजूंर करत भुकनला दि.15 जुलै पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. सरकारी पक्षांतर्फ एस.एम. बागले यांनी काम पाहीले. संदिप वराळ हत्याप्रकरणी प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम व पारनेर येथील अ‍ॅड संकेत ठाणगे काम पाहत आहे.