Breaking News

जिल्हा वाचनालयातर्फे निबंध लेखन स्पर्धा

अहमदनगर/प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी (दि.1 ऑगस्ट) निमित्ताने शालेय तसेच महाविद्यलयीन विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दोन गटात होणार आहेत. पहिला गट (लहान गट) शालेय इ.7 वी ते 10 वी. विषय- 1) माझ्या कल्पनेतील शिक्षण 2) माझी सहल, माझा अनुभव 3) मी मुख्यमंत्री झालो तर. गट क्र.2 - खुला गट. विषय 1) भारतीय स्वातंत्र्य व लोकमान्य टिळक 2) माझे सामाजिक कर्तव्य, 3) आयुष्य : एक रंगभूमी, 4) सुंदर नगरची माझी कल्पना. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, उपाध्यक्ष शिल्पा रसाळ-जोशी, अजित रेखी, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, संयोजक किरण आगरवाल, ग्रंथपाल अमोल इथापे यांनी केले आहे.