Breaking News

खर्डे येथील हनी बनी स्कूलमार्फत वृक्षारोपण व दिंडी सोहळा

देवळा/वार्ताहर
खर्डे  येथील हनी बनी इंग्लिश मेडिअम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्ष लागवड जनजागृती साठी  पायी दिंडी सोहळा आयोजित केला .या स्कुलच्या चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून व गळ्यात टाळ घालून संपूर्ण गावातून दिंडी काढली . यावेळी चिमुकल्यांनी  हातात   झाडे  लावा झाडे  जगवा  पाणी आडवा पाणी जिरवा  ही  घोषवाक्ये लिहिले फलक हातात घेऊन शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत आपला  सहभाग नोंदवून  जनजागृती केली . चिमुकल्यांची दिंडी ही वृक्ष लागवड जनजागृतीसाठी मोठ्यांना  एकप्रकारे संदेश देणारी ठरली . महिला वर्गाकडून या चिमुकल्यांच्या दिंडीचे कौतुक करण्यात आले . यासाठी यशवंत देवरे,किरण जाधव, राकेश जाधव,सचिन सावकार, सुभाष देवरे, प्रवीण शिंदे,जगदीश देवरे,विलास देवरे तसेच स्कुलच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले .