Breaking News

पाथर्डीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पाथर्डी/प्रतिनिधी
 पाथर्डी नगरपालिकेचे गटनेते नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत शेळके यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
 यावेळी आ.मोनिका राजळे म्हणाल्या की, शासन शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मदत करत असते. ही मदत पुरेशी नसल्याचे भान ठेवत प्रशांत शेळके यांच्या सारखे तरुण मंडळाच्यावतीने असा सामाजिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देतात ही बाब कौतुकास्पद आहे. शहरात आज अनेक सामाजिक संस्था असून वंचित घटकाच्या गरजा ओळखून ते त्यांच्या प्रगतीमध्ये खारीचा वाटा देण्याच्या भावनेतून काम करत आहेत. नवरात्र गणपती सारख्या उसत्ववात या मंडळाचे विशेष योगदान असते. तसेच माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनीही आपल्या भागातील गरीब जनतेसाठी सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
 यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, नगराध्यक्ष मृत्युजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक नंदकुमार शेळके, रमेश गोरे, प्रसाद आव्हाड, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, नगरसेविका संगीता गटाणी, मंगल कोकाटे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकान, सुनील ओहळ, नितीन गटांनी, सुभाष चोरडिया, चंदमल देसरडा, जाजू पटवा, सतीश तरटे, बबलू घुले, अक्षय इधाटे, शुभम लांडे आदी जण उपस्थित होते.