Breaking News

राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने तंबाखू निर्मूलन अभियान

पारनेर/प्रतिनिधी
 न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायंन्स कॉलेज पारनेर  या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.11 जुलै रोजी तंबाखू निर्मूलन अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयातील स्वयंसेवकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
 या कार्यक्रमाच्या दरम्यान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी आरोग्याचे महत्व सांगितले. धुम्रपानामुळेे मानवी शशिरावर कोणते परिणाम होतात. तसेच धुम्रपानाचे दुष्परिणाम याबाबत वैज्ञानिक बाजुने सविस्तर विश्‍लेषण केले व जिवन खूप सुंदर आहे. आंनदमय आहे तेव्हा कोणत्याही व्यक्ती ने व्यसनाच्या आहारी जावू नये, महाविद्यालयातील तरुणांनी धुम्रपानाच्या अहारी जावू नये, कारण तरुण या देशाची खरी संपत्ती आहे. देशाचे खरे भविष्य तरूण शक्तीच्या हतात आहे. असे मत उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी व्यक्त केले.
 या व्यसनमुक्तीसाठी सामुहिक शपथ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी देखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 247 स्वयंसेवका बरोबर घेतली. या सामुहीक शपत कार्यक्रमात डॉ. हरेष शेळके, डॉ.दिपक सोनटक्के प्रा. संजय आहेर, डॉ.अशोक घोरपडे, प्रा.प्रतिक्षा तनपुरे, प्रा.स्नेहल आहेर, प्रा.दत्तात्रय घुंगार्डे, प्रा.रघुनाथ नजन, प्रा.युवराज वाघीरे, प्रा. शिवाजी पठारे देखील सहभागी झाले होते.