Breaking News

कामगिरी दमदार गरज सरो वैद्य मरो माझं काय आडल केकेची कोंडी

लोकसभेमधील मताचं गणित फुटलं वाटतय भाजपाच्या खासदारांनी भाजपाच्या खरेदीदार ठेकेदार विरोधात नितीन गडकरीना घरचा आहेर दिला

 
मुरबाड
भिवंडी लोकसभा मतदार संघातुन भाजपा किंवा शिवसेना या पक्षातुन खासदारकीची निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेले शहापुर मुरबाड 800 कोटी रूपये निधी असलेल्या रस्त्याचे ठेकेदार निलेश सांबरे यांनी राज्याचे भाजपा मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते ते पालकमंत्री अशी फिल्डींग लावुन भिवंडी लोकसभेत आमचं ठरल्याची भुमिका स्वपक्षीयाना निर्माण करायाला लावली त्याच निलेश सांबरे यांना भाजपा सेनेने खासदारकी साठी वापरून घेतलं कल्याण भिवंडी लोकसभेची जबाबदारी स्थानिक मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांच्यावर सोपवली त्यांच्या पुढे निलेश सांबरे गेले नाहीत. मात्र असावादी आमदार किसनराव यांच्या चाहात्यांना कथोरे यांना मंत्रीपद देवुन खुष सुध्दा केले नाही. या सार्‍या प्रवाहाची सुरूवात भाजपाचे खासदार कपील पाटील यांनी केंन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन देवुन कारवाईची मागणी निलेश सांबरे यांच्यावर केली आहे. हा भाजपाला घरचा आहेर आणि कोणाकोणाला बाहेरचा रस्ता याचे समिकरण समजावं अशी वृध्दात चर्चा आहे. खासदार कपील पाटील यांनी मनावर घेतलं असतं तर पालघरचं पालकमंत्रीपद किसनराव कथोरे यांना मिळालं असतं कारण पालघर भिवंडी कल्याण हे तीन खासदार किसनराव कथोरे यांनी निवडुण आणलेत शिवाय तेव्हा पासुनच निलेश सांबरे यांचा मुख्यमंत्र्याकडुन मुरबाड प्रवास झाला हा तर राजकारणातील खलीवली आहे. खासदारकी निवडणुक काळामध्ये ठेकेदार निलेश सांबरेयांनी बेकायदेशीर खदाण उत्खन्न केले अवैध उत्खन्नाचे पंचनामे महसुल खात्यांनी केले त्यातुन भुकंप झाला कोलठण गांव हादरला गरीबाची घरे पडली लोक सैरेवैरे पळु लागले पोलिसांत गुन्हां दाखल झाला महसुल अधिकार्‍यांनी पंचनामा केला तहसिलदार तलाठी सर्कल यांनी हातवर केले परवानगी दिली नाही. मात्र प्रांत अधिकारी कल्याण ठाणे महसुल संबधित अधिकार्‍यांनी परवानगी दिली असे पत्र निलेश सांबरे यांनी आणले तीन महिने लाटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार कपील पाटील आमदार किसनराव कथोरे गप्प होते. पुन्हा निलेश सांबरे यांची खदाण सुरू झाली पुन्हा गांवकर्‍यांनी निलेश सांबरे यांच्या वाहानाची तोडफोड केली निलेश सांबरे यांनी गांवगुंडांच्या फौजा मुरबाड मध्ये आपल्या मिडीया सर्व विकत घेतली नेते खिशात अशी आफवा पसरवली आणि पोलिसांचा कायदा फाटयावर मारून लाच देवून 6 युवकांवर दरोडयाचे गुन्हे दाखल केले.तेव्हा आमचे खासदार आमदार मुख्यमंत्री पालकमंत्री गप्प होते निलेश सांबरे यांनी 48 कोटीच्या रस्त्यावरील माती डांबर उखळून तेथेच दाबली त्यांच्या यंत्रणची शाबासकीदिली शेकडो कोटी भ्रष्टाचाराला मुठमाती देवुन एमएमआरडी नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्‍यांना वाचवण्याचा सत्ताधार्‍यांचा डाव आहे. परन्ंतु खासदार कपील पाटील यांनी निलेश सांबरे यांच्या ठेकेदारीवर आरोप घेवुन कारवाईची मागणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावळुन थेट नितीन गडकरी रस्ते विकासमंत्री दिली यांना निवेदन देवुन भाजपात घरचा पहिला आहेर आहे. खासदर कपील पाटील यांना तक्रारीचं नाटक वाटत असेले तरी विरोधी भुमिकेतील निर्भिड लढावू संघटना कार्यकर्ते उद्या न्यायालयात पुरावा सादर करतील यात शंका नाही. आरपीआय सेल्क्युलर, मनसे अन्य सामाजिक संघटनांनी आंदोलने केली असुन जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी मुरबाड म्हसा कर्जत रोडची इडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची फाईल गेले दोन वर्षे कारवाईच्या प्रतिक्षेत आहे. कपील पाटील एक एकाचा पत्ता ओपन कट करून खासदारकीच्या निवडणुकीचा बदला घेतील अशी चर्चा आहे. त्यांना रोखण्यासाठी एकीकडे भिवंडी काल्हेर मधील गोदामे अतिक्रमण कारवाई समिती तयार होत आहे. तर दुसरीकडे खासदार कपील पाटील भाजपाला घरचा आहेर देत आहे.