Breaking News

संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पाटोद्यात जोरदार स्वागत

पाटोदा | प्रतिनधिीः-
अंगावर पावसाच्या धारा,तोंडी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष, सोबतीला घुमनारा टाळ - मृदुंगाचा गजर , देह भान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी,विठ्ठल - रुक्मिणीच्या भेटीसाठी आतुर असलेले वारकरी टाळ - मृदुंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर नाचत पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे रविवार सहाच्या सुमारास पाटोदा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच नगरपंचायत व पाटोदा ग्रामस्थाच्या वतिने शहरात जोरदार ढोल ताशाच्या गजरात तोफाची सलामीदेत स्वागत करण्यात आले पाटोदा शहरातील युवकान कडुन अनेक ठिकाणी वारकर्यान साठी मोफत नाष्टा चहाची सोय केली होती तर यावर्षीची रात्रीच्या जवनाची महा पगत शरद देशमुख यांच्याकडे होती संकाळी नऊ वाजता वाजत गाजत पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या