Breaking News

वर्धा घटनेच्या निषेधार्थ शेवगावमध्ये ‘रास्ता रोको’

शेवगाव/प्रतिनिधी
 वर्धा जिल्ह्यातील मौजे आर्वी येथील मातंग समाजाच्या आठ वर्षाच्या मुलाला मंदिरात गेला म्हणून तापलेल्या लादीवर बसवून ठेवले व मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याच्या निषेधार्थ शेवगाव भारतीय लहुजी सेना व युवा सेना यांच्यावतीने शेवगावच्या क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
  या घटनेमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज भारतीय लहुजी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आर्वी येथील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले.
 निवेदनात पुढे शेवगाव तालुक्यातील बोधेगाव गावातील काही गुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी गट नंबर 104 नंबर वरील अतिक्रमण केलेली जमीन ही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी, ही मागणीही यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच आर्मी घटनेतील आरोपी वर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई  करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
 यावेळी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता रोको करण्यात आला. यावेळी  युवा सेनेचे राज्य प्रमुख अभिमान कांबळे, महाराष्ट्र राज्य सचिव हनीफभाई पठाण, संजय ससाणे, बाळासाहेब बागुल, सुरेश आढागळे, मंगल चव्हाण, राजश्री उमापबाई, मुकेश आढगळे, शकील भाई, संजूभाऊ ससाणे, अशोक ससाणे, भगवान मिसाळ, शिवाजी शिरसाठ, ताराचंद खंडागळे, कारभारी बर्वे, संतोष बानाईत, मोहन भारस्कर उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्यावतीने घोषणाबाजी करण्यात आली.