Breaking News

चौसाळ्यात मॉबलिचींगच्या विरोधात बंद

चौसाळा | वार्ताहरः-
मॉबलिचींगच्या विरोधात चौसाळा येथे आज कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सर्व समाजातून नागरिकांनी मोर्चा काढून निवेदन दिले. बीड तालुक्यातील चौसाळा येथे आज मॉबलिचींगच्या विरोधात बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच बाजारपेठे बंद होती. व्यापार्‍यांनीही उस्फुर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदवला. सर्व युवक आणि नागरिकांनी मोर्चा काढून तबरेज अन्सारी याच्या कुटूंबियांना न्याय देण्याची मागणी केली. देशात ठिकठिकाणी होणार्‍या मॉबलिचींगच्या घटना रोखण्यासाठी केंद्र शासनाने तातडीने पाऊले उचलावीत अशी मागणी मोर्चेकर्‍यांच्यावतीने करण्यात आली.