Breaking News

भूईकोट किल्ल्यातील हॉलमध्ये क्रांती दिनानिमित्त कार्यक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी
“काँग्रेस केवळ पक्ष नव्हे तर ती एक स्वातंत्र्य देणारी आणि स्वराज्याकडे वाटचाल करणारी चळवळ आहे. आजच्या कठीण परिस्थितीत ही चळवळच देशाला न्याय देऊ शकेल’’, असा विश्‍वास कॅप्टन पी.जी.चौधरी यांनी व्यक्त केला.
9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नगर शहर काँग्रेस व भिंगार काँग्रेसच्या संयुक्त कार्यक्रम येथील भूईकोट किल्ल्यातील नेता कक्षाच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॅप्टन चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नल काशीद होते.
प्रारंभी आयोजक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी स्वागतपर भाषणात 9 ऑगस्ट क्रांतीदिनाची माहिती दिली ’’
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, अ‍ॅड. साहेबराव चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल परदेशी, अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज खान आदींची भाषणे झाली. यावेळी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राज्यातील पुरात मृत झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यानंतर बहारदार कवी संमेलन झाले. कवी संमेलनात प्रारंभी कवी विवेक येवले यांनी राष्ट्रभक्तीपर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रेमसुख लोढा, उपाध्यक्ष शशिकांत पवार, सरचिटणीस अभिजीत कांबळे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, जिल्हा युवक सरचिटणीस मोबीन शेख, उपाध्यक्ष आर.आर.पाटील, ग्यानमल गांधी, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे, अनिल वराडे, निजाम पठाण, राजेश बाठीया, सुनील उल्हारे, संतोष धीवर आदी उपस्थित होते. शेवटी प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर यांनी आभार मानले.