Breaking News

मुख्यमंत्री नगरला येणार पण सभा होणार नाही

नगर/प्रतिनिधी
 माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. महाजनादेश यात्रा रविवार,25 ऑगस्ट रोजी स्थगित करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री यात्रेसाठी मूळ कार्यक्रमानुसार ठिकठिकाणी जमलेल्या लोकांना भेटतील. पण यात मुख्यमंत्री कोणतीही भाषणे होणार नाहीत किंवा हार स्वीकारणार नाहीत, असे यात्रा प्रमुख प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.
 अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केवळ लोकांना भेटले. पण कोठेही स्वागत आणि हारफुले स्वीकारले नाहीत. महाजनादेश यात्रेला रविवारी पुर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा नगरमध्ये येणार होती. त्यामुळे नगरमधील रविवरच्या अकोले, संगमनेर, राहुरी व नगर शहरातील सभा रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सोमवारी नगरमध्ये असतील. गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरी सांत्वन भेट घेणार आहेत. त्यानंतर ते नगर शहरातील गाठीभेटी घेऊन पत्रकारांशी सवांद साधतील. यांनतर ते पाथर्डी येथून यात्रेला सुरवात करतील.