Breaking News

शेवगामध्ये दिव्यांग मार्गदर्शन मेळावा फोटो

शेवगाव/प्रतिनिधी
आज (रविवार) शेवगाव तहसील कार्यालयामध्ये शेवगाव तालुक्यातील दिव्यांगांकरिता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती दिव्यांग विकास आघाडी तसेच बाबासाहेब महापुरे सावली दिव्यांग कल्याणकारी बुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी जिल्हा परिषद मधून २०१९-२० मध्ये असलेल्या योजनासाठी माहिती देण्यात आली. डेंग्यू  मलेरिया करिता औषध उपचारासाठी ९९ रुपयात १० हजार रुपये अर्थसहाय्य करिता ६० दिव्यांग बांधवांचे विमे भरण्यात आले. यावेळी चाँद शेख, नवनाथ औटी, रमेश भागवत, खलील शेख, संदीप चेडे, प्रदीप मराठे, मनोहर मराठे, बळीराम तानवडे, सावळीराम काळे, हिरामण लहासे, भाऊसाहेब गव्हाणे, गोर्डे मनोज, दिव्यांग बांधव उपस्थित होते.