Breaking News

पत्रकार उमेश दारुणकर यांची आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील 15 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका वृत्तपत्राच्या जिल्हा प्रतिनिधीने मंगळवार (दि.13) दुपारी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. उमेश दारुणकर असे आत्महत्त्या केलेल्या इसमाचे नाव आहे. परंतु त्याने आत्महत्त्या का केली असावी, याबाबतचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.
पत्रकार उमेश दारुणकर हे गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून शहरातील एका वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजखाली गोवा एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.