Breaking News

रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जतकरांची पूरग्रस्तांना मदत

 शरद पवार, धनंजय मुंडे यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप


कर्जत/प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या वतीने कराड तालुक्यातील तांबवे या गावातील पूरग्रस्तांना रोहित पवार यांच्या पुढाकारातून धान्य, कपडे व इतर वस्तूंचे वाटप झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते या वस्तूंचे वितरण करण्यात आले. वेळीच मदत मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब

तापकीर, श्याम कानगुडे, नितीन घांडे, उद्योजक दीपक शिंदे, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, शाहूराजे भोसले, युवा नेते गणेश क्षीरसागर, ऋषिकेश धांडे, तांबवे गावचे सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच रवींद्र ताटे तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत पुराचे संकट निर्माण झाले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कर्जत व जामखेड तालुक्यातील नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेतला.

कराड तालुक्यातील तांबवे हे गाव चार दिवस पुराच्या पाण्याखाली होते. त्यांना या मदतीने मोठा दिलासा मिळाला आहे.
 सध्या या भागात पुराचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. यावर मात करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे लागणार आहेत. कर्जत व जामखेड तालुक्यातील जनतेने विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. या पुढील काळातही सर्वांच्या सहकार्यातून येथील नागरिकांना मदत व दिलासा देण्याचे काम सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही रोहित पवार यांनी यावेळी बोलताना दिली.