Breaking News

कामगार संघटनेचा कंत्राटी पद्धतीला विरोध

अहमदनगर/प्रतिनिधी
शहरातील चारही प्रभागातील कचरा संकलन व वाहतूक करणेकामी मजूर पुरविण्यासाठी मनपाने निविदा मागविली होती. सदरचा ठेका हा आकांक्षा एन्टरप्रायजेस या खाजगी संस्थेस देण्यात आलेला होता. मात्र, युनियनने या ठेक्यास विरोध करुन संप नोटीस महापालिका आयुक्तांना बजावली होती. त्यास अनुसरुन सहाय्यक कामगार आयुक्तांनी सुनावणीसाठी  औद्योगिक विवाद अधिनियम 1947 चे कलम 11 नुसार समेट कार्यवाही सुरु केली होती.
समेट कार्यवाहीमध्ये युनियनने संप नोटीशीतील मागण्यांबाबत बाजू मांडल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी औद्योगिक विवाद अधिनियम 1947 मधील तरतुदीनुसार सदर ठेक्यास स्थगिती देऊन ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. अंमलबजावणी न केल्यास महापालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असल्याने युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व आनंदराव वायकर यांनी म्हटले आहे.