Breaking News

पोलिसांच्या नावे असलेली सरकारी भूखंडाची सनद परत ताब्यात

उल्हासनगर
शहरातील विविध भुखंड व प्लॉट्स वरील सी. डी. अथवा सनद वरील मालकी हक्काच्या नावांची कागदोपत्री हेराफेरी झाल्याचा आरोप करीत साई वसणशा दरबार व एका संघटनेने गेली सहा महिने केलेल्या परिश्रमांच्या परिणामस्वरुप, दरबारासह पोलीस प्रशासनाची ही लॉटरी लागली आणि प्रांताधिकार्‍यांनी त्यांच्या नावे असलेली सनद ताब्यात दिल्याने, पोलीस प्रशासनात आनंद पसरला.
शहरातील अनेक प्लॉट्स च्या मालकी हक्काच्या सी. डी. ह्या गेल्या वर्षांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकल्या होत्या. एका प्लॉट च्या दोन सनदशीर दावेदार झाल्याने, उपविभागीय कार्यालय संशयाच्या रडारवर होते. सिंधी समाजाचे श्रद्धास्थान साई वसणशा दरबाराची सी. डी. आपल्या नावे असल्याचा दावा एका स्थानिकाने केल्यानंतर, प्रांत कार्यालयाने सदर बाबत नोटीस बजावण्यात आल्या नंतर, शहरातील सिंधी समाजात रोषपूर्ण वातावरण निर्माण झाले. ह्या प्रकरणा मुळे अनेक महिने धुमशान उठवत, शहरातील जागृक मंडळींनी एस व्ही एस नामे संघटना तयार करून, आंदोलन ठाकले. परिणामी ताणतणावात शासकीय यंत्रणेवर चांगलाच दबाव गट निर्माण झाला आणि अखेर, उपविभागीय अधिकार्यांनी खातरजमा करून व दावा केलेल्या अर्जदाराने ही माघार घेतल्याने, सदरची सनद रद्द करून पुन्हा दरबारे नामे करण्यात आली.
 असाच प्रकार पोलीसांच्या एका भुखंडाबाबत उपस्थित झाल्याचे उघड झाल्याने, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ह्याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांना, सदर प्रकरणाची चौकशी करून, भुखंडाची कागदपत्रे प्रांताधिकारी कार्यालयातून, पाठपुरावा करून ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार भामे व हेड कॉन्स्टेबल नेटके ह्यांनी उपविभागीय अधिकार्यांकडे रितसर पाठपुरावा सुरू ठेवला होता व त्याच अनुषंगाने प्रांताधिकारी तारासिंग गिरासे यांनी , अन्य व्यक्तीच्या नावे चढविण्यात आलेली पोलिस भुखंडाची सी. डी. रद्द करून, पुन्हा पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या नावे अधिकृतरीत्या करून, वपोनि भामे यांच्या सुपुर्द केली. त्यामुळे पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
अशा प्रकारे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे जनतेतून समझले आहे. पण आता दोन सनद उपविभागीय कार्यालयाकडून पुन्हा मूळ मालकांच्या नावाने केले असतांना, अजून किती दोन वेगवेगळ्या नावांनी चढवण्यात आलेल्यांची घोळ झालेला असल्याचा प्रश्‍न, नागरिकांच्या ठायीठायी खदखदत आहे.