Breaking News

भिंगार हायस्कूल विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

भिंगार प्रतिनिधी
येथील भिंगार हायस्कूल येथे 1986-87  या वर्षीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संवर्धन मेळावा नुकताच  झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी झंवर होते. यावेळी तत्कालीन शिक्षक शरद बरबरे, प्रकाश डेरे, नरसिंह रसाळ, जयप्रकाश पोळ, आप्पासाहेब गावडे, शिरसाठ, भालसिंग, उमाकात पैठणकर, माधवी दंडवते, निर्मला होनराव, सुजाता घोडके, कल्पना कुकडे, मीनाक्षी धाडगे, हायस्कूलचे उपमुख्याध्यापक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मंगल कलश, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी हायस्कूलसाठी दोन लाऊडस्पीकर व दोन माईक भेट दिले. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने सन्मान सोहळ्यास सुरुवात झाली.राजेश पारेकर यांनी प्रास्तविकात स्नेहसंवर्धन मेळाव्याचा उद्देश विषद केला.
छाया खेडकर व दर्शना बरबरे यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा देशपांडे यांनी आभार मानले. स्नेहसंवर्धन मेळावा यशस्वीतेसाठी पत्रकार सुधीर कुलट, अभय रायकवाड, ज्ञानेश्‍वर शिंदे, राजेश पगारे, सुरेश बेरड, ललीत शिंदे, रमेश तनपुरे, राम पांढरे, धनंजय मुळे, अजय टकले, विजय घोलप, संजय कोंगे, सचिन थोरात, दीपक शिरतुरे, विद्या जोशी, ज्योती चौधरी, संगीता चौरे, संगीता जोशी, सुमन केदारे आदींनी परिश्रम घेतले.