Breaking News

सावेडीतील आधार केंद्रावर छापा

अहमदनगर/प्रतिनिधी
सावेडी येथील राज एंटरप्राइजेस सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलातील आधार केंद्रावर गमी फिंगर वापरणार्‍या विरोधात  कारवाई करण्यात आली. येथून गमी फिंगरची किट जप्त करण्यात आली आहे. जहीर उद्दीन सर्फुद्दिन शेख यांच्या नावे रजिस्टर्ड आहे. त्याचप्रमाणे सावेडी येथील इरफान गोल्डन टच या महा ई-सेवा केंद्रावर सुद्धा कारवाई करण्यात आली. तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली. निवासी नायब तहसीलदार बारवकर रावसाहेब, सावेडी मंडलाधिकारी दशा भाऊसाहेब, तलाठी देशपांडे भाऊसाहेब हे कारवाईत सहभागी झाले होते.