Breaking News

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान किसान योजना

मुंबई
प्रधानमंत्री किसान मानधन योजना भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांनी वृद्धावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकर्‍यांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकर्‍यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना दरमहा रक्कम 3 हजार रुपये निश्‍चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतीय जीवन विमा निगम (एल.आय.सी.) द्वारा प्रबंधित पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकर्‍यांना पेन्शन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मार्गदर्शन सूचनेनुसार 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकर्‍यांना त्यांचे 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम 55 ते 200 रुपये प्रती माह मासिक हप्ता वयाचे 60 वर्षे पुर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकर्‍यांनी पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्त्याइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकर्‍यांच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती,पत्नी स्वतंत्र पणे योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची 60 वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे 3 हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांनी योजनेमध्ये भाग घेतलेला असून काही कारणामुळे त्यांना योजनातून बाहेर पडावयाचे असल्यास त्यांनी पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्कम व्याजासह त्यांना परत करण्यात येईल. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांचे सेवानिवृत्ती तारखेपुर्वी (म्हणजेच वय 60 वर्षे होण्यापुर्वी) आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे 60 वर्षे वयापर्यंतचे उर्वरीत मासिक हप्ते पती, पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करुन त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवू शकतात. सेवानिवृत्ती तारखेपुर्ती निधन झालेल्या पती, पत्नी शेतकर्‍याचे पेन्शन खाते बंद करावयाचे असल्यास त्या पती, पत्नी शेतकर्‍याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदार पती, पत्नी शेतकर्‍यास मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपुर्वी निधन झालेल्या शेतकर्‍यास पती, पत्नी नसल्यास त्या शेतकर्‍याने पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदारास मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपुर्वी निधन झालेल्या शेतकर्‍याचे पती, पत्नीस दरमहा 50 टक्के म्हणजेच पंधराशे रुपये पारिवारीक मासिक पेन्शन मिळेल.  या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी पी.एम.किसान योजनेच्या लाभातून प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अंशदायी हप्ता रक्कम कपात करण्यात येईल.


योजनेसाठी अपात्रतेचे निकष
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एन.पी.एस.), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड आर्गनायझेशन स्किम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (पी.एम.एस.वाय.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनामध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी लाभार्थी खालीलप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील.