Breaking News

पीककर्जाचा अर्ज नाकारल्याने शेतकर्‍याचे बँकेतच विषप्राशन

बीड / प्रतिनिधी
धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पीककर्जाचे अर्ज स्वीकारत नसल्याने एका शेतकर्‍याने शाखा व्यवस्थापकाच्या कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. राजाभाऊ बंकट कांदे (40) असे शेतकर्‍याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. जहागीरमोहा येथील राजेभाऊ कांदे हे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पीककर्जासाठी वांरवांर चकरा मारत होते; मात्र बँकेकडून त्यांचा अर्ज स्वीकारपश जात नव्हता. त्यामुळे व्यथित झालेल्या कांदे यांनी बुधवारी दुपारी शाखाधिकार्‍यांच्या कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.