Breaking News

माणूसकी ही खरी संपत्ती - प्राचार्य डॉ. गणेश दामा

मुरबाड 
 कोल्हापूर, सातारा, सांगली येथील जिल्ह्यात पुरहानी होऊन अनेक कुटूंब बेघर झाली असताना त्यांच्या मदतीला महाराष्ट्रातील लाखो नागरिक एकत्र येऊन मदतीचा हात देण्याचा संकल्प मनात बाळगून महाराष्ट्रात कोणतेही संकट आले तरी एकतेची साथ काय असते हे जगासमोर सिध्द झाले आहे. कोणी आर्थिक मदत केली, तर कोाणी कपडे - भांडी - अन्न अशा अनेक प्रकारच्या मदतीने लोकांचा समुदाय पुढे येत पुढाकार घेतला आणि कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या पुरहाणीग्रस्त नागरिकांना आपल्या परिने ज्या ज्या वस्तूंची अवश्यक्यता आहे अशा सर्व पध्दतीची मदत करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थेने मदत करून माणूसकी जपली आहे. अशी माणूसकी जेव्हा गुरूच्या रूपात असलेले शिक्षकवर्ग, कर्मचारी वृंद महाविद्दयालयाच्या माध्यमातून जपते तेव्हा खर्‍या अर्थाने देवाचेच रूप समोर येते कारण गुरू हे देवाचेच रूप आहे आणि अशा रूपाची लिला संकटात असतानाच प्रकटीकरणात येते. अशाच प्रकटीकरणाचे विचार कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातील जलप्रलाय पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मांडणारे अहमदनगर जिल्हयातील औतूर येथिल श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी, डुंबरवाडी महाविद्दयालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद विभागाने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी द्वारे आपले एक दिवसीय पगार पुरहाणीग्रस्तांना मदतीच्या स्वरूपात देऊन आपली महाराष्ट्रीयन परंपरा जोपासली आहे.
कोणत्याही अडचणी, समस्या असल्या कि सढळ हाताने मदत करण्यासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी, डुंबरवाडी महाविद्दयालय संस्थेचे अध्यक्ष श्री. विशालशेठ तांबे, मानद सचिव श्री. वैभवशेठ तांबे, या महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ. गणेश दामा हे धाऊन जात असतात.त्यांनी यावेळीही पुरहानीग्रस्तांना सर्वांनी एकत्र येऊन ज्या ज्या परिने मदत करता येईल ती आपण सर्व मिळून करू अशी मनोधारणा समोर मांडून मानूसकीची झरी निर्माण करीत महाराष्ट्रीयन सर्वधर्म संहिष्णूता जागृत ठेवली त्यांच्या या विचाराने तेजस्वी विचार समोर आले आणि आपला एक दिवसीय पगार मदत स्वरूपात करू असे ठरले.त्यांच्या या वैभवशाली विचाराने एक दिवसीय अवघे 35640 -/ (पस्तीस हजार सहाशे चाळीस) रूपये इतकी मदत पुरहानीग्रस्तांना करण्यात आली आहे. संकटात शासनाची मदत पुरीशी नाही म्हणून समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांनी एकत्र येऊन पुरग्रस्तांसाठी समन्वय साधण्यांची गरज आहे असे प्राचार्य डॉ.गणेश दामा यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.