Breaking News

श्रीगोंद्यात सर्व रोग निदान शिबीर

कोळगाव/प्रतिनिधी

 पिरॅमिड हॉस्पीटल, दौंड व अस्तित्व फाऊंडेशन, श्रीगोंदे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन प. पू. मोरेदादा हाॅस्पिटलमध्ये करण्यात आले होते. सरस्वती नदी सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष गोरख आळेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक गरजू रुग्णांसह मान्यवरांच्याही तपासण्या करण्यात आल्या.

   यावेळी वृक्ष वाटप करण्यात आले. प.पू. मोरेदादा हाॅस्पिटल मध्ये या शिबिरामधील सुविधांचा लाभ गरजू रुग्णांना कायम स्वरुपी मिळणार आहे असे यावेळी गोरख आळेकर यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गोरख आळेकर यांच्या कार्याचा गौरव केला. ज्योती आनंदकर, शुभांगी पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीगोंदे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, श्रीगोंदेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता ज्योती आनंदकर, एम. डी .मेडिसीन डॉ. महेंद्र पाटील, शल्यचिकीत्सक डॉ .लक्ष्मीकांत सप्तर्षी आदी उपस्थित होते.