Breaking News

कृणाल पांड्याला एकदिवशीय सामन्यात संधी मिळायला हवी : व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

नवी दिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने वन-डे क्रिकेटमध्ये कृणाल पांड्याला अधिकाधिक संधी मिळायला हवी असं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या कॉलममध्ये लक्ष्मणने आपलं मत मांडलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत कृणाल पांड्याने मालिकावीराचा किताब पटकावला आहे.
कृणाल पांड्या चाणाक्ष खेळाडू आहे. त्याला त्याची क्षमता चांगली माहिती आहे. त्याला वन-डे क्रिकेटमध्ये अधिकाधीक संधी मिळायला हवी. माझ्यामते तो सहाव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो आणि दहा षटकांचा कोटाही पूर्ण करु शकतो. लक्ष्मणने कृणालच्या खेळाचं कौतुक केलं. कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळाच्या आधारावर भारताने टी-20 मालिकेत 3-0 ने बाजी मारली. यावेळी लक्ष्मणने टी-20 मालिकेत बाजी मारलेल्या तरुण खेळाडूंचं कौतुक केलं. टी-20 मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघासमोर आता वन-डे मालिकेचं आव्हान असणार आहे. गयाना येथील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.