Breaking News

जलसुरक्षा विषयाचा अभ्यासक्रमात समावेश : आशिष शेलार

मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसुरक्षा हा विषय देशाच्या पातळीवर हाती घेतला असल्याने व याचे महत्व विचारात घेऊन जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला असून इ. 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याची माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
यावेळी शेलार म्हणाले की, इयत्ता 9 वी ते बारावी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय 9 जुलै, 2019 अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन इ.9 वी व इ. 10 वी करिता या शासन निर्णयान्वये सन 2019-20 पासून इ.9 वी व इ.10 करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना तयार करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इ.9 वी व इ. 10 करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता  लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन 80 गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन 20गुणांचे राहील अशी घोषणा शेलार यांनी केली. इयत्ता 9 वी ते इ.12 वी च्या विषय योजना, मूल्यमापन योजना (परीक्षा पध्दती) त्या सोबतच अन्य केंद्रीय मंडळांचा अभ्यासक्रम, विषय योजना, मूल्यमापन योजना (परीक्षा पध्दती) याचा अभ्यास करून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याना सर्वसमावेशक विषय योजना व मूल्यमापन पध्दती असावी यासाठी गठीत केलेल्या समितीने केलेल्या अभ्यासातून काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत ज्यातून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याना स्पर्धात्मक परीक्षांना सक्षमतेने सामोरे जाता येईल.