Breaking News

अरुण जेटली यांच्या निधनाने भारतीय संघ काळ्या फीतसह मैदानात

नवी दिल्ली
माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. जेटली यांच्या निधनाने देशभरासह भारतीय संघही दु:खात आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौर्‍यावर असून, सुरु असलेल्या कसोटी सामन्यात खेळाडू काळ्या फित लावून मैदानात उतरणार आहेत. अरुण जेटली यांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार करण्यात आले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. जेटलींनी नोटाबंदी आणि जीएसटीसारखे धाडसी निर्णय घेतले होते. जेटली यांच्या निधनानंतर बीसीसीआयने एक ट्विट केले असून यामध्ये त्यांनी जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे तब्बल 13 वर्षे दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट संघटनेचा कारभार पहिला होता.