Breaking News

अनुकंपा तत्वावर नोकरी अथवा 15 लाख रुपये देणार : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई
ऊर्जा विभागातील अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्‍या इच्छूकांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुकंपातत्त्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असणा-यांना नोकरी किंवा 15 लाख रूपये देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण व महापारेषण कंपनीच्या अधिकर्‍यांना दिले. या दोन्ही कंपनीच्या एकत्रित झालेल्या बैठकीत डिसेंबर पर्यंत हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. अनेक वर्ष हा निर्णय प्रलंबित असल्यामुळे प्रतिक्षा यादी मोठी होती. अनुकंपा तत्वावरील प्रलंबित असणार्‍यांना 15 लाख रुपये देवून वन टाईम सेटलमेंट किंवा त्वरीत नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महावितरणमधील 1100 व महापारेषणमधील 222 इच्छूकांचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदत होईल. या बैठकीत ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद सिंह, मराविम कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक, महावितरण चे संचालक (मानव संसाधन) पवनकुमार गंजू उपस्थित होते.