Breaking News

स्कॉटलंडने टी-20 मध्ये ठोकल्या 252 धावा

200 धावांची सलामी भागीदारी

नवी दिल्ली
क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे नेहमी म्हटले जाते. मात्र या खेळात दुबळ्या मानल्या जाणार्‍या स्कॉटलंड संघाने महापराक्रम करून दाखवला आहे. नेदरलँड्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात स्कॉटलंडने 252 धावा ठोकल्या आहेत. सुमित नागलने गाठले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानस्कॉटलंडची ही टी-20 क्रिकेटमधील सहावी सर्वोत्तम खेळी ठरली. त्यांनी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध केलेल्या 248 धावांचा विक्रम मोडला आहे.
याआधी अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध खेळताना 3 बाद 278 सर्वोच्च धावा चोपल्या होत्या.252 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सला 7 बाद 194 धावा करता आल्या. स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सी आणि गोएत्झर यांनी पहिल्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली. टी-20 क्रिकेटमधील ही पहिल्या विकेटसाठी तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे. अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला झझाई आणि उस्मान घनी यांनी आयर्लंडविरुद्ध 236 धावांची भागीदारी केली होती. स्कॉटलंडच्या मुन्सीने 56 चेंडूंत 5 चौकार आणि 14 षटकारांची खेळी करताना नाबाद 127 धावा केल्या. तर, गोएत्झरने 5 षटकारांसह 89 धावा केल्या. नेदरलँड्सचा कर्णधार पिटर सीलरने हा पराभव टाळण्यासाठी 96 धावांची खेळी केली खरी पण त्याला अपयश आले.2017 मध्ये भारतानेही श्रीलंकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये 5 बाद 260 धावा केल्या होत्या. हा विक्रम स्कॉटलंडकडून अवघ्या 8 धावांनी वाचला आहे. यामध्ये रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी 165 धावांची भागीदारी रचली होती.